उत्कृष्ट लेन्स निवडा:-
– उत्तम दृष्टी
– चांगले कॉन्ट्रास्ट
– नैसर्गिक रंग
– उत्तम शार्पनेस
– जाळी येण्याची शक्यता कमी.
Multifocal (मल्टीफोकल) सध्याची अद्ययावत अशी लेन्स जर तुम्हाला जवळचा व लांबचा चष्मा नको असेलतर ही लेन्स उपयुक्त आहे. ९५ टक्के लोकांना ही लेन्स घातल्यावर दैनंदिन व्यवहारात चष्मा लागत नाही. नेहमीच्या लेन्समध्ये लांबचे बिना चष्म्याचे किंवा छोट्या नंबरने चांगले दिसते. परंतु जवळच्या कामासाठी मात्र चष्मा लागतो.
Trifocal (ट्रायफोकल) सध्याची अद्ययावत अशी लेन्स हा मल्टीफोकल लेन्सचा अत्याधुनिक प्रकार असून यात जवळच्या दृष्टीची रेंज वाढविण्यात आली आहे. थोडक्यात चष्म्याच्या प्रोग्रेसिव्ह प्रकारासारखी ही लेन्स काम करते.
एक्स्ट्रा यु. व्ही. प्रोटेक्टीव्ह पिवळ्या छटेमुळे पडद्याला अपायकारक अशी नील व अतिनील (UV) किरणे गाळली जातात. यामुळे वाढत्या वयामुळे होणारी पडद्याची हानी टळते.
Aspheric Lens (अस्फेरिक) या लेन्सचा बाहेरील भाग कमी गोलाकार असल्याने किरण योग्य रितीने केंद्रित होतात आणि दृष्टीतील सुस्पष्टता वाढते.
Toric (टोरीक) ही लेन्स सिलेंडर नंबर असल्यास वापरावी लागते. सहसा १.० पेक्षा जास्त सिलेंडर असल्यास ह्या लेन्सचा सल्ला दिला जातो.
एक्सटेंडेड डेप्थ लेन्स या लेन्सच्या प्रकारात मोनोफोकल आणि मल्टीफोकल दोन्हीचे गुणधर्म आहेत. तसेच रात्री ड्रायव्हींग करताना होणारा त्रास या लेन्समुळे होत नाही. परंतु अगदी जवळचे वाचायला चष्मा लागू शकतो.
मल्टीफोकल / ट्रायफोकल लेन्स या भिंगात अनेक रिंग्ज असतात. प्रत्येक रिंग मधून निरनिराळ्या अंतरावरील वस्तू स्पष्ट दिसतात. भिंग बसविल्यावर काही दिवसातच पेशंटच्या मेंदूला या भिंगाची सवय होते आणि दूरचेजवळचे बिनाचष्म्याचे दिसू लागते.
मल्टीफोकल/ट्रायफोकल लेन्स बसविण्यापूर्वी हे माहित असू द्या. मल्टीफोकल भिंग बसविल्यानंतर जवळ जवळ ९५% लोकांमध्ये चष्म्याची गरज पडत नाही. दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झाल्यावर ही शक्यता आणखी कमी होते. मल्टीफोकल भिंग बसवून घेतलेल्या रुग्णांना वाचन करताना चांगल्या प्रकाशाची गरज असते. काही लोकांना नेहमीपेक्षा बारीक अक्षरे वाचताना जवळचा छोटा नंबर लावावा लागण्याची शक्यता असते. रात्रीचे ड्रायव्हिंग करताना समोरुन दुसऱ्या वाहनाचा फोकस डोळ्यावर पडल्यास त्याच्या भोवती वलये दिसू शकतात.