लहान मुलांचे डोळे कधी तपासावेत?

लहान मुले आपल्या डोळ्याचा त्रास सांगू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची नेत्र तपासणी ही अत्यंत गरजेची असते. काही डोळ्यांचे आजार जसे लहान मुलांना होणारा मोतिबिंदू, काचबिंद, तिरळेपणा, पडद्याचे दोष, बुबुळाचे आजार, नंबर असणे इ. आजार वेळीच उपचार न केल्यास कायमचे अंधत्व अथवा डोळ्याचा अधुपणा येऊ शकतो.

जन्मल्यानंतर केव्हा केव्हा नेत्र तपासणी करावी काहीही डोळ्याचा त्रास नसला तरीही । पहिल्या महिन्यात । दर वर्षी एकदा

१) ३२ आठवडे (साडे आठ महिने) आधी जन्मलेल्या २) किलोपेक्षा कमी वजन असलेल्या ३) आय.सी.यु. किंवा पेटीत ठेवावे लागलेल्या बाळांना अंधत्वाचा
धोका असतो.

आपण ही माहिती न वाचल्यामुळे आपल्या बाळाच्या भविष्याचे नुकसान करीत आहात का ?
आपल्या नवजात बालकाचे डोळे सुरक्षित आहेत का ? वेळेआधी जन्मलेल्या बाळाची पडद्याची वाढ खुंटून पडदा सरकू शकतो, वेळीच लेसर उपचारांनी ९० ते ९५ टक्के दृष्टी वाचू शकते…