डोळ्यासमोरील काळे डाग |

वयानुसार आपल्या डोळ्यात बदल घडत असतात. लेन्सच्या मागील विट्रीअस या पदार्थाचे द्रवात रुपांतर होते. यामुळे डोळ्यासमोर निरनिराळ्या आकाराचे डाग दिसतात. जे डोळा हालला की हालतात. जवळ जवळ ५० ते ७० टक्के लोकांना आयुष्यात कधीना कधी हे होते.

लवकर होण्याची कारणे
-मोठा नंबर
-मार लागणे
-सूज येणे

३ गोष्टी ध्यानात ठेवाव्यात
१) पावसासारखे अचानक पुष्कळ नवीन काळे डाग आले.
२) सतत वीज चमकल्यासारखे चमकू लागले.
३) दृष्टीत अंधुकपणा आल्यास
……………..त्वरीत पडदा तपासून घ्यावा.