मधुमेहाचे नेत्रपटलावरील दुष्परिणाम डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणजे काय ? । वाढलेल्या साखरेमुळे पडद्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये बदल होऊ शकतात. । रक्तवाहिन्या बंद होणे, सूज येणे, रक्तवाहिन्यांची कमकुवत जाळी तयार होणे इत्यादी बदल दिसू शकतात. वेळीच उपचार न केल्यास रक्तस्त्राव, पडदा सरकणे, पडद्याची सूज, काचबिंद यामुळे कायमचे अंधत्व येऊ शकते.


कशामुळे हे दुष्परिणाम वाढतात ?
१) साखर नियंत्रित नसणे. २) जास्त ब्लड प्रेशर, ३) रक्तातील चरबीचे प्रमाण. ४) रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असणे. ५) दीर्घकालीन आजार, ६) तंबाखू, बीडीचे व्यसन. ७) मानसिक तण-तणाव. ८) अति मद्यपान इत्यादी मधुमेह व्यवस्थित नियंत्रित असतानाही हे दुष्परिणाम येऊ शकतात. पण ते बऱ्याचदा सौम्य स्वरुपाचे
व औषधोपचाराने ठिक होणारे असतात.

उपचार १) इंजेक्शन : अस्टिन, लुसेंटीस, मॅक्युजेन, स्टिरॉईडस् इत्यादी दृष्टी वाढविण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी या इंजेक्शन्सचा वापर होतो. २) लेसर : पडद्याच्या सूजेसाठी सौम्य लेसर (फोकल लेसर) केले जाते, तर रक्तवाहिन्यांच्या जाळ्यासाठी पूर्ण लेसर (पी.आर.पी.) केले जाते.
३) ऑपरेशन : रक्तस्त्राव, पडद्यावरील ताण आणि पडदा सरकणे यासाठी डायबेटिक पडदा-पडद्याची सूज ओसीटी ऑपरेशन करावे लागू शकते.

मधुमेहाच्या पडद्यावरील आजारासाठी एकाहून अधिक प्रकारच्या उपचारांची
गरज असू शकते तसेच उपचार हे पुन्हा-पुन्हा करावे लागू शकतात पडद्याच्या आणि मधुमेहाच्या आजारावरील उपचाराचे सर्वोत्तम लेसर…

आता आपल्या मिरजेमध्ये आकाशदीप नेत्रालयात अत्याधुनीक मल्टिस्पोट LASER उपलब्ध…. ,

-सुरक्षित
-सर्वात अद्यावत
-वेदनारहित
-१० मिनीटात पूर्ण उपचार