मोठा नंबर आहे त्यामुळे काच जाड दिसते, काय करावे ? पातळ काच मिळू शकेल का ? हाय इन्डेक्स काच म्हणजे काय ? ज्यांना जास्त मोठा नंबर आहे, अशांसाठी ही काच उपयुक्त आहे. त्यामध्ये आपणाला नंबर जरी जास्त असेल तरीही काच पातळ बनवू शकतो. यात आपल्याला दोन पर्याय आहेत. काच किंवा प्लास्टीक दोघांमध्ये करु शकतो.

कॉन्टॅक्ट लेन्सेस: ज्यांना चष्म्याची सवय नाही किंवा चष्मा नको आहे अशांसाठी कॉन्टॅक्ट लेन्स हा चांगला पर्याय आहे. कॉन्टॅक्ट लेन्समुळे डोळ्यासमोरील संपूर्ण नजर मिळते. ती चष्म्यात मिळत नाही. कॉन्टॅक्ट लेन्सेस आपण विविध रंगांचे देखील घेऊ शकतो.

योग्य चष्म्याची निवड कशी करावी ? ज्यांना फक्त लांबचा नंबर आहे, त्यांना साईज खूप मोठी घ्यायची गरज नाही. लांबचा नंबर हा + किंवा – मध्ये असू शकतो. ज्यांना लांबचा आणि जवळचा दोन्ही नंबर आहेत, त्यांनी चष्म्याची साईज थोडी मोठी घ्यावी. कारण त्यात दोन नंबर बसवावे लागतात. चष्म्याचे प्रकार : ज्यांना लांब आणि जवळचा असे दोन नंबर आहेत, त्यांच्यासाठी खालील पर्याय आहेत.

महत्वाची सूचना ज्यांना पहिल्यांदा जवळचा व लांबचा नंबर लागलेला आहे, त्यांनी जीना चढताना अथवा उतरताना नेहमी चष्म्याच्या वरच्या भागातून पहावे. म्हणजे पायऱ्या खाली-वर झालेल्या दिसणार नाहीत, मात्र जवळचे बघताना खालच्या भागातूनच पहावे. चष्म्याची सवय व्हायला वेळ लागतो.

जवळचा नंबर लागला… कुठला चष्मा करावा..?

प्रोग्रेसीव्ह लेन्स
१) एका वेळेस लांबच, मधल्या अंतरावरचे आणि जवळचे काम करु शकतात.
२) काचेवर कोणतीही लाईन येणार नाही.
३) चष्मा दिसताना चांगला दिसेल आणि वयाचा येणारा नंबर ओळखू येणार नाही.
४) प्रोग्रेसिव्ह चष्म्याची सवय होण्यासाठी कमीत कमी आठ दिवस लागतात.

बायफोकल लेन्स
१) बायफोकल काचेमध्ये लांबचे आणि जवळचे दिसते, मधल्या अंतरावरचे दिसत नाही.
२) काचेवर गोल राऊंड दिसेल. बायफोकलमध्ये चष्म्यातला नंबर वयाचा आहे हे ओळखू येईल.
३) बायफोकल चष्म्याची सवय होण्यासाठी कमीत कमी आठ दिवस लागतील.

कॉम्प्युटरचा वापर करणाऱ्यांसाठी प्रोग्रेसीव्ह लेन्स हा चांगला पर्याय आहे.

चष्मा बनवताना कोणत्या मटेरिअलमध्ये आपण बनवून घेऊ शकतो?
काचा: काचेचे वजन जास्त असते व काच लवकर फुटते पण काच लवकर घासली जात नाही. तसेच खराब होत नाही आणि काचेचे आवरण हे जास्त काळ टिकते ओरखडे कमी येतात.
प्लास्टीक: वजनाने हलके असते, खाली पडले तरी फुटत नाही. पण प्लास्टीक सांभाळून वापरावी लागते. कारण वरचे आवरण लवकर घासले जाऊ शकते.
कोटींग: कोटींग हे आपण काचेवर व प्लास्टीक दोघांवर करु शकतो. त्यामुळे संगणक वापरताना किंवा ड्रायव्हींग करताना फायदा होतो. काचेवर कोटींग केल्यामुळे नजरेमध्ये अधिक स्पष्टपणा वाढतो.

१) अँटी रीफ्लेक्टींग (ARC) लेन्स: जे किरण परावर्तित होतात त्यापासून हे आवरण संरक्षण करते. आणि नजरेत सुधारणा होते. रात्रीच्या वेळेस गाडी चालविताना त्रास कमी होतो.

२) हार्ड कोट: फायदे : जर काचेवर हाई कोट म्हणून आवरण करुन बनवले तर लेन्स ही जास्त काळ टिकते. त्यावर ओरखडे लवकर येत नाहीत म्हणून हाई कोट वापरणे गरजेचे आहे. हाई कोट तयार करताना त्यावर सीलीका म्हणून एक घटक वापरतात आणि त्यामुळे काचेवर ओरखडे पडत नाहीत आणि त्या कायेचा
टिकाऊपणा हा देखिल वाढतो.

उन्हापासून डोळ्यांचे संरक्षण कसे करावे ? डोळ्याच्या संरक्षणासाठी आपल्याला गॉगल मिळतात ज्यांना उन्हांत खूप जास्त वेळ रहावे लागते अशांसाठी तीन पर्याय आहेत. फोटोक्रोमॅटीक लेन्स, टिन्टेड लेन्स आणि पोलराइज्ड लेम्स ज्यामध्ये १००% सुर्यापासून संरक्षण होते. त्यामध्ये निरनिराळ्या रंगांच्या शेड मिळतात.

१) फोटोक्रोमॅटीक लेन्सेस : (डे-नाईट/फोटोसन)
फायदे : १) दोन वेगळे चष्मे सोबत नेण्याची गरज नाही. एकच चष्मा हा आपण उन्हात आणि सावलीत वापरू शकतो.
२) कारण फोटोक्रोमेटीक काच ही उन्हात काळपट होते आणि सावलीत पांढरी होते.
३) फोटोकोमॅटीक काच ही डोळ्यांचे संरक्षण करते, उन्हापासून नजरेला त्रास होऊ देत नाही.
४) १००% संरक्षण होते. यु. व्ही. किरणांपासून डोळ्याचे नुकसान होत नाही.

२) पोलोराइजींग लेन्स : ड्रायव्हींग करताना ही काच जर वापरली तर त्रास कमी होतो.

3) टिन्टेड म्हणजे काय ? हा गॉगल तयार करुन घ्यावा लागतो, यामध्ये शेड ही सारखी राहते, उन्हात किंवा सावलीत रंग बदलत नाही.