काचबिंदू म्हणजे काय?

काचबिंदू डोळ्याचा सर्वात घातक आजार
आपणास काचबिंदू आहे का ? आपण तपासले आहे का? काचबिंदू हा एक सुप्त आजार आहे की ज्यामुळे दृष्टी पूर्णपणे जाऊ शकते.

जर तुम्हाला खालील पैकी एक जरी घटक सतावत असेल तर आपण आपली काचबिंदूची तपासणी करुन घेणे अत्यंत गरजेचे आहे.
अ) चाळीस वर्षांपेक्षा जास्त वय
ब) कुटुंबात काचबिंदू किंवा आंधळेपणाचा इतिहास
क) मधुमेह
ड) थायरॉईड ग्रंथीचे आजार
इ) मोठ्या नंबरचा चष्मा
फ) चष्मा नंबर कमी करण्याची शस्त्रक्रिया करवून घेतली असेल तर (लॅसिक किंवा आर. के.)
ग) डोळ्यासमोर वलये दिसत असल्यास, डोळा दुखत असल्यास, चक्कर येत असेल व डोळ्याला पाणी मारत असेल तर
ट) डोळ्याला इजा झाल्यास

लक्षात असू द्या, आपण काचबिंदूच्या सुरुवातीच्या स्थितीत दवाखान्यात आल्याशिवाय डॉक्टर आपली काहीच मदत करू शकत नाहीत. कारण काचबिंदूचे दुष्परिणाम नंतर बदलता येत नाहीत.

आकाशदीप नेत्रालय आपणांस काचबिंदूच्या सर्वांगीण तपासण्या व त्यापासून बचावाचे उपचार उपलब्ध करीत आहे.
ऑटोमेटेड पेरिमेट्री (दृष्टीक्षेत्र तपासणी)
स्पेक्ट्रल OCT
बुबुळाच्या तपासणीसाठी पॅकीमेट्री (जाडीची तपासणी)
ऑब्जेक्टीव्ह व सब्जेक्टीव्ह मॉनिटरींग औषधोपचार व शल्य चिकित्सा

OCT मशीन

काचबिंदूमुळे झालेल्या दुष्परिणामांचा आराखडाही दाखविते शिवाय दुष्परिणाम व्हायच्या आधी देखील धोक्याची सूचना आगाऊ देऊ शकते.

-बऱ्याच रुग्णांना कोणताच त्रास होत नाही. (जेव्हा त्रास सुरु होतो तेव्हा उशीर झालेला असतो)
-काचबिंदू बरा होत नाही, जगात कुठेही त्यावर रामबाण इलाज झालेला नाही. (जसा मधुमेह बरा होत नाही पण नियंत्रणात ठेवता येतो हेच काचबिंदूच्या बाबतीत आहे)
-काचबिंदू पूर्ण नेत्र तपासणी शिवाय निदान होणे शक्य नसते. (अशी तपासणी दर सहा महिन्याला करणे जरुरी असते)
-काचबिंदूचे थेंब आयुष्यभर घालावे लागतात. (जसे ब्लडप्रेशरच्या गोळ्या आयुष्यभर घ्याव्या लागतात.)
-काचबिंदूचे ऑपरेशन झालेले असले तरी दर सहा महिन्याला तपासणी करावी लागते.

आपल्याला काचबिंदू झाला असल्यास आपल्या सर्व रक्ताच्या नातेवाईकांना (सर्व वयाच्या) याची कल्पना द्यावी व त्यांना काचबिंदूच्या तपासण्या करून घेण्यास सांगावे. कारण काचबिंदू अनुवंशिक असतो व तो कोणत्याही वयात होऊ शकतो.

लवकर निदानामुळे आपण अंधत्वाचा धोका टाळू शकता..
आणि उत्तम आयुष्य जगू शकता